
कोविद वारियर रेणुका फाउंडेशनच्या वतीने अन्न दान व साहित्य चे वाटप
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही
माजलगाव येथील कोविड वॉरियर रेणुका वाघमारे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वडवणी तालुक्यातील ढेकणमोहा येथील अनाथालयातील पसायदान मुलींना. खाऊ शालेय साहित्य तसेच आज दिनांक 16 मे 2025 रोजी करण्यात आले
रेणुका अभिमन्यू वाघमारे( गवळी) या शासकीय रुग्णालयातील नर्स म्हणून कार्यरत होत्या तर कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे या काळातच त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे दुःखद घटना 2021 मध्ये घडली तेव्हापासून वाघमारे कुटुंबीयांनी कोविड वॉरियर रेणुका फाउंडेशनची स्थापना केलेली असून त्या फाउंडेशनच्या अंतर्गत विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत यामध्ये संविधान दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात संविधानाची प्रत वाटप रक्तदान शिबिर शासकीय रुग्णालयात फळ वाटप शासकीय रुग्णालयातील गोरगरीब गरजवंत रुग्णांना आर्थिक मदत असे विविध सामाजिक उपक्रम राबविले त्यांच्या स्मृती जपण्याचे काम केले आहे यावर्षी देखील रेणुका वाघमारे (गवळी )यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वडवणी तालुक्यातील ढेकणमोहा येथील पसायदान अनाथालयातील मुलांना खाऊ शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी फाउंडेशनचे सचिव रमेश गवळी अध्यक्ष अनिकेत वाघमारे पसायदान चे अनाथालयाचे श्री दराडे श्रीमती दराडे व अनाथालयातील चिमुकले व वाघमारे कुटुंबीय उपस्थित होते दरम्यान मिळालेल्या खाऊ ने चिमुकल्या अनाथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलून आले