पणन विषयक कार्यशाळेचे उपसभापती श्रीहरी नाना मोरे यांचे हस्ते उद्घाटन
पत्रकार परमेश्वर चांदणे इंडियन टीव्ही न्यूज
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था एन आय पी एच टी तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जून 2025 रोजी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती संचालक मंडळ व सचिव यांच्यासाठी पणनविषयक एक दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन उपसभापती श्रीहरी नाना मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजलगाव बाजार समितीचे संचालक भगवान आगे अमोल जाधव नंदकिशोर सचगणे आबाजी भोसले सचिव एचएन सवणे नितीन पौळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपनिबंधक सचिन घोडके उप व्यवस्थापक महादेव बर्डे गोपाळ कृष्ण परदेशी उपस्थित होते राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या असल्याने नवीन संचालक मंडळ कार्यरत झालेले आहे कार्यशाळेच्या सुरुवातीला मंत्री जयकुमार रावल यांचा नूतन संचालकासाठी शुभ संदेश भाषणाची क्लिप सर्व उपस्थितथासमोर प्रस्तावित करण्यात आली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कृषी उत्पादने व नियमन गोपाल कृष्ण परदेशी यांनी कलम 37 अन्वे बाजार समिती फीचा उपयोग व बाजार समितीवर आव्हाने आणि उपाययोजना सचिन घोडके यांनी बाजार समितीचे गुण क्रमांक पद्धती महादेव बर्डे यांनी कृषी उत्पन्न विषयक विविध योजनांचा या विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले या कार्यशाळेत अमृत जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यशाळेसाठी महादेव बर्डे तळेगाव दाभाडे येथील अधिकारी राजेश नाफडे अजय नागवडे बाजीराव दर्डे यांनी परिश्रम घेतले