मानवी हक्क अभियानाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
पत्रकार परमेश्वर चांदणे
मानवी हक्क देण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री मिलिंदजी आव्हाड यांच्या मार्ग दर्शनाखाली व राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आज माजलगाव उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये विविध ठिकाणाहून कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या
या मोर्चामध्ये त्यांच्या विविध प्रमुख मागण्या 1978 ते 1990 या कालावधीमध्ये कशात असलेली सर्व गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावे करण्यात यावे व त्यांच्या ताब्यात असलेले पीक पंचनामे करून ई रजिस्टर मध्ये नोंदी कराव्यात
आर टी बार्टी या संस्थेला भरीव ठोस निधी उपलब्ध करावा
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ महात्मा फुले विकास महामंडळ संत रोहिदास विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ मौलाना अब्दुल कलाम महामंडळ भरीव आर्थिक तरतुदी कराव्यात
तसेच ऊसतोड कामगारांना विम्याचे संरक्षण देऊन ऊसतोड कामगारांना माथाडी कामगार कायद्याप्रमाणे तरतुदी लागू कराव्यात अशा विविध मागण्यासाठी आज मानवी हक्क अभियानाच्या वतीने प्रचंड मोर्चा काढण्यात आला यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी निवेदन स्वीकारून पुढील कारवाईस्तव पाठवले आहे
तसेच या मोर्चाच्या वेळी राजेश क्षीरसागर यांनी हा मोर्चा एक छोटासा आहे व पुढील येणाऱ्या काळामध्ये ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जिल्ह्याच्या ठिकाणी नव्हे तर थेट मंत्रालयावर मानवी हक्क अभियानाच्या वतीने प्रचंड हा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला