प्रतिनिधी विठ्ठल कदम शिवपुरीकर
नांदेड/ हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी आय लव्ह मोहम्मद चे फलक हाती घेत भारतातील सर्वात मोठा राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे पोलिसांनी २५ व्यक्तीबर गुन्हा नोंद केलेला ते गुन्हा मागे घेण्यात यावे या मागणीसाठी हदगाव शहरातील सकल मुस्लिम बांधवांनी आझाद चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तामसा रोड मार्ग तहसील कार्यालयावर विराट असा मोर्चा काढण्यात आला होता, याप्रसंगी हदगाव शहरातील मुस्लिम समाज बांधवांमधील सर्व पंथीय लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
तसेच नारेबाजी करत अक्षरशः हदगाव शहर हादरून गेले होते उत्तर प्रदेश
राज्यातील कानपूर शहरात जशने ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये काही युवकांनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावले त्या बॅनर मुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी काही मुस्लिम युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे मुस्लिम समाजाचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.व) चे बॅनर लावले हे कसा गुन्हा होऊ शकते भारतीय संविधानाने दिलेल्या त्यांना त्यांच्या धर्माचे पालन व अनुकरण करण्याचे अधिकार दिले आहे परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या पदाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. व तीव्र निषेध व्यक्त करून हातात आय लव मोहम्मद असे लिहून यूपी पोलीस प्रशासनाचे निषेध करत तहसीलदार यांच्याकडे भारताचे महामहीम राष्ट्रपती द्रोपती मोर्मु यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले याप्रसंगी जामा मस्जिद चे सदर फ रोज खान, नायब सदर अमजद खान, मक्का मस्जिद चे इमाम अमेर रजा, मौलाना समीर रजा, हाफीज गुलाम हुसेन अलिमी रजा, मुफ्ती अजीज खान पठाण मरकज चे हाफिज जिया इशाती, शेख खाजा भाई, अहेमद खान, सोहेल खान, आदी अनेक समाज बांधव मुस्लिम धर्मगुरू व युवकांची उपस्थिती होती.