भंडारा गोंदिया जिल्ह्याला एकही मंत्रि नाही.
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते नाराज
येणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत महायुतीला नुकसान होण्याचे शक्यता.
गोंदिया – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात महायुती ला चांगले यश आले, दोन्ही जिल्हा मिळून सात पैकी सहा जागेवर महायुती चे उमेदवार निवडून आले.सहा आमदारा मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार तर शिवसेना शिंदे गटाचे एक आणि भाजप चे तीन आमदार निवडून आले.साकोली मतदार संघातून महाविकास आघाडीचे काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले अवघ्या दोनसे मताने निवडून विधानसभेत पोहचले, इतका भर भरून महायुतीला यश मिळाले , दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि जिल्हा वासियांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या कीं या मंत्रिमंडळात जिल्हावासियांना त्यांचा हक्का चा मंत्री आणि पालक मंत्री नक्की मिळेल पण पळसाला तीनच पान असे झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज हा गोंदिया जिल्ह्यात असल्यामुळे आणि तीन वेळा निवडून आलेले आमदार विजय रहांगडाले यांना या मंत्री मंडळात स्थान नक्की मिळेल अशी अपेक्षा होती, निवडणुकी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची स्तुती करताना विजय रहांगडाले आमदार हे पाणीदार आमदार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे तिरोडा गोरेगाव विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना भरभरून मत दिले त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, भाऊ मंत्री होतील आणि या क्षेत्राचा विकास होईल असे मत या विधानसभा क्षेत्राच्या जनतेचे होते,महारष्ट्राच्या पूर्व आणि शेवटचा जिल्हा गोंदिया चा विकासकरण्यासाठी याच मातीतला व्यक्ती जिल्ह्याचा मंत्री आणि पालकमंत्री होणे गरजेचे आहे, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला एकही मंत्रीपद मिळाला नसल्यामुळे जिल्ह्यातील जनता नाराज दिसत आहे, त्यामुळे आगामी होणाऱ्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यातील जनता आपली नाराजी कश्याप्रकारे दाखवेल हे त्याच वेळेस समजेल.
प्रवीण शेंडे
ब्युरो चीफ
गोंदिया